प्रतिनिधी – फिरोज भालदार
दि. ११/०९/२०२३ रोजी पहाटे ४ वा. सुमारास रात्रगस्त करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, चालक पोलीस हवालदार शितोळे यांना माहिती मिळाली ओमनी गाडी नंबर MH.११. CG १८४८ यामधून अवैद्य गावठी हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुपा पोलिसांनी सुपा ते लोणी पाटी या रोडवरती सापळा रचून शहाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुपा येथे गाडी पकडून गाडीची झडती घेतली असता, त्यामध्ये ३५ लिटर क्षमतेचे १० ड्रम अवैद्य गावठी हातभट्टी दारू ने भरलेले मिळून आले.
सदरची अवैध्य हातभट्टी दारू व गाडी असे मिळून एकूण ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गाडी चालक प्रतीक बाळासो रणदिवे,त्याचा साथीदार सुमित विठ्ठल बनसोडे, रा.सांगवी ता. फलटण जि. सातारा, दारू तयार करणारा राहुल राठोड, रा.दाते वस्ती उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे, हातभट्टी दारू विकत घेणारा सुनील सचिन खुडे रा. सांगवी ता. फलटण जि. सातारा यांच्यावरती सुपा पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३२८, ३४ व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५,८३,९८आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार जाधव, वाघोले, पोलीस हवालदार शितोळे, साळुंखे, पोलीस शिपाई जावीर, ताडगे,दरेकर, साळुंखे यांनी मिळून केली .