• Home
  • माझा जिल्हा
  • माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Image

माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी

 केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

इयत्ता १२ वी, पदविका व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी इंजिनिअरिंग, बी.टेक, एमबीबीएस, बीडीएस, बी.एड, बीबीए, बी. फार्म, बीसीए, एमबीए, व एमसीए आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची यादी व अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.

अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या परिशिष्ट १ ते ३ च्या प्रती सैनिक कल्याण अधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, सह अधिष्ठाता, निबंधक अथवा संचालक आदींची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेत व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ई-मेलद्वारे देण्यात आलेल्या तारखेस अर्जाची प्रिंट व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२२८७ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स.दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026