प्रतिनिधी- फिरोज भालदार
खंडाळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत खंडाळा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे खंडाळा तालुकाध्यक्ष संतोष मालुसरे, उपाध्यक्ष शौकत शेख, शिरवळ शहराध्यक्ष सुजित दगडे, लोकेश चव्हाण, सिध्देश्वर भरगुडे आदी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खंडाळा तालुक्यात पीक पावसाअभावी डोळ्या देखत करपून जात आहे.
दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप अपेक्षेप्रमाणे पाऊस नसल्याने खरिपाची पिके वाया गेली आहेत. पावसाच्या भरवशावर शेतकरी यांनी सोयाबीन, कांदा, मका, बाजरी, भुईमूग आदी कडधान्याची पेरणी केली होती. पावसाने हुलकावणी दिल्याने आदी पिके जळाली आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न आदी कामे करणेही शक्य होणार नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण होणार आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून खंडाळा संभाजी ब्रिगेड च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.