मुख्य मजकुरावर जा
Wednesday, 16 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 25 September 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

*कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर* *इच्छुकांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 25, 2023 1 मिनिट वाचन 8,518 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

बारामती, दि. २५: कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज १० ऑक्टोबरपर्यंत तहसिल कार्यालय,बारामती येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत-मंगळवार १० ऑक्टोबर (सुट्टीचे दिवस वगळून), प्राप्त अर्जापैकी पात्र, अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करणे- गुरुवार १२ ऑक्टोबर, लेखी परीक्षा-रविवार १५ ऑक्टोबर, अंतिम निवडसूची आणि प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी बुधवार १८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मळद (अनुसूचित जाती महिला), निबुंत-(अनुसूचित जमाती महिला), सिरष्णे व जळगाव सुपे (अनुसूचित जमाती), सुपे (भटक्या जमाती-ब), तरडोली (भटक्या जमाती-ड), शिरवली (विशेष मागास प्रवर्ग), जळोची, नारोळी, मोढवे (इतर मागास प्रवर्ग), लोणी भापकर (आर्थिक दुर्बल घटक महिला) कन्हेरी (आर्थिक दुर्बल घटक), माळेगाव व शिर्सूफळ- (सर्वसाधारण महिला) असे एकूण १४ गावातील आरक्षण निश्चित करण्यात आहे.

कोतवाल संवर्ग सरळसेवा भरती जाहीरनामा संबंधित गावातील चावडी, ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी गावकामगार तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कोतवाल निवड समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख