बारामती ! सनउत्सवा दिवशी शांतता प्रस्थापित रहावी म्हणून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन चे आयोजन.

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि.२५/०९/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत स. ११.३० ते दु. २ वाजेपर्यंत गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलादूनब्बी सणाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वतीने वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बु, चोपडज, करंजेपुल या गावात पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आले. गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलादुनब्बी सणाचे अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित रहावी या उद्देशाने सदरचे पथसंचलन काढण्यात आले होते . गाव गावात सनोउत्सवा दिवशी शांततेत सन उत्सव पार पडावे यानिमित्ताने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलना / रूठ मार्च काढण्यात आले.

          सदर पथसंचलन / रूठ मार्च मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व 12- पोलीस अंमलदार, 6-नवप्रविष्ठ पोलीस शिपाई सोलापुर व खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र व 10-होमगार्ड तसेच 02-सरकारी वाहन यांचा सदर पथसंचलना मध्ये समावेश करण्यात आला होता .