वैयक्तिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या अनुदान वितरीत

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या शेततळ्यांना २ कोटी ४७ लाख ४१ हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याकरिता या योजनेमध्ये सन २०२३- २४ या वर्षासाठी ४ कोटी ४४ लाख ४४ हजार रुपये इतक्या रकमेचा आर्थिकक लक्षांक देण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत विविध ८ आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील.

योजनेतील वैयक्तिक शेततळे घटकांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून आतापर्यंत ७३८ लाभार्थींना ऑनलाईन पूर्वसंमती दिलेली आहे. यापैकी ३९९ लाभार्थींना २ कोटी ४७ लाख ४१ हजार रुपये अनुदान थेट बँक खातेमध्ये अदा करण्यात आलेले आहे. उर्वरीत लाभार्थींना काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलेले आहे.