प्रतिनिधी अक्षय थोरात
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील वर्षी घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मधील विषय क्रमांक नऊ हा मंजूर असल्याचे प्रोसिडिंग मध्ये नमूद करण्यात आले होते यावरून संचालक मंडळाला सभासदांनी धारेवर धरून चांगलाच जाब विचारला तसेच यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन केशव बापू जगताप यांनी सदर विषय हा रद्द केले असल्याचे सांगितले दरम्यान विरोधी संचालक चंद्रराव तावरे रंजनकुमार तावरे यांनी सदर प्रस्ताव हा लेखी स्वरूपात रद्द केला असल्याचे पत्र द्या अशी मागणी केली यावर सभागृहामध्ये एकच गोंधळ उडाला व संचालक मंडळाकडून सोमेश्वर सहकारी कारखाना कार्यक्षेत्रातील दहा गावे कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत असे लेखी स्वरूपात पत्र लिहून दरम्यान काही काळ सभा थांबविण्यात आली होती तसेच माहिती मागण्याच्या मुद्द्यावरून माझी चेअरमन रंजन कुमार तावरे व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यामध्ये झालेल्या वादावरून संघर्ष पुत्र माझी चेअरमन रंजनकुमार तावरे यांची कार्यकारी संचालक यांनी माफी मागावी याकरिता सभेमध्ये एकच सूर उमटला
दरम्यान यावरून सभेमध्ये किरकोळ गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले