प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय ,सोमेश्वरनगर , राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ०३/१०/२०२३ रोजी महाविद्यालय परिसरामध्ये स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबविण्यात आले.
या अभियानाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपतराव सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छतेचे महत्व व गरज पटवून दिली, यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा प्रवेशद्वार, परिसर व मैदान यांची स्वच्छता केली,
तसेच परिसरातील झाडांना आळी करून त्यांची निगा राखली.
या अभियानाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे यांनी केले .
यावेळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य धनंजय बनसोडे , प्रा अजित जगताप, प्रा संतोष पिंगळे प्रा विजय थोपटे,
प्रा राजश्री शेळके, प्रा जयश्री भोसले, प्रा. सुनिता घाडगे , प्रा शुभांगी कांबळे, रासेयो कमिटी सदस्य,
इतर प्राध्यापक – प्राध्यापकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.