संपादक मधुकर बनसोडे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राज्यात ऊसदराची पहिली कोंडी फोडून सभासदांची दिवाळी गोड करणार असल्याचा आभास निर्माण केला व दिवाळी गोड करायची सोडून सभासदांची दिवाळी सोमेश्वरच्या चेअरमन संचालक मंडळाकडून कडू करण्यात आली?
असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासद करीत आहेत.
गतवर्षी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांकरता दिवाळीची साखर प्रती कार्ड 30 किलो प्रमाणे दिली जात होती
मात्र चालू वर्षी 30 च्या ऐवजी 40 किलो साखर मिळेल या अपेक्षित असणाऱ्या सभासदाला सोमेश्वर कारखान्याकडून दिवाळीसाठी फक्त दहा किलो साखर वाटप केली जाणार असल्याचे परिपत्रक जाहीर झाले?
त्यामुळे सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटला आहे. आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय अशा अनेक प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये कारखान्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी ज्या चेअरमन संचालक मंडळाचा सभासदांकडून ऊस दराबाबत सत्कार केला गेला त्याच चेअरमन संचालक मंडळावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून वाईट पोस्ट होणे म्हणजे एक प्रकारे कारखाना प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढणे?
परिपत्रकामध्ये सुधारणा करून सभासदांना दिवाळी करता 40 किलो साखर मिळावी अशी अपेक्षा सभासद वर्गांमधून केली जात आहे.
परिपत्रकामध्ये सुधारणा करून 40 किलो साखर दिवाळी करता न दिल्यास मोठा आंदोलन उभे केले जाईल असा देखील इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सभासदांनी दिलेला आहे.