सोमेश्वरच्या दिवाळीसाठी दहा किलो साखरेच्या त्या परिपत्रकावरती अजूनही सोशल मीडियामध्ये धुमशान. सोमेश्वर च्या गोड साखरेची कडू कहाणी !!

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून दिवाळीसाठी दहा किलो साखर देणार असल्याचे परिपत्रक जाहीर झाले आणि गेल्या दोन दिवसापासून सोमेश्वरच्या कारभाऱ्यांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून धुमशान सुरू झाले.

 यामध्ये कधी नव्हे ते अनेक राजकीय नेत्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसत आहे.

 काही नेते मंडळी तर राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना देखील निवेदन दिले आहे निवेदनात असे म्हटले आहे की गतवर्षीप्रमाणेच सोमेश्वर च्या सभासदाला दिवाळी करता 30 किलो साखर देण्यात यावी.

 तर काही सभासदांनी सोमेश्वर कारखान्याच्या कारभाऱ्यांना उपोषणाचा इशारा दिलेला आहे.

 सोमेश्वर चे कारभारी नेत्यांचा आदेश आल्यानंतरच ते परिपत्रक रद्द करून तीस किलो साखर देणार. की मालकांच्या भावनांचा आदर राखीत ते परिपत्रक मागे घेणार हे पहाणे अवचित्याचे ठरणार आहे.

 कारखाना सुरू होण्याच्या अगोदरच कारखान्यावरती साखरेसाठी उपोषण करण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा.