• Home
  • माझा जिल्हा
  • सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत “सेल्फी विथ माटी” जागतिक विश्व विक्रम सहभाग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले
Image

सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत “सेल्फी विथ माटी” जागतिक विश्व विक्रम सहभाग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले

प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय , सोमेश्वरनगर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे मेरी माटी , मेरा देश या अभियानांतर्गत मातीला नमन आणि वीरांचे वंदन करण्यासाठी महाविद्यालयात ‘सेल्फी विथ माटी’ जागतिक विश्वविक्रमामध्ये सहभागी होत होण्यासाठी अमृत कलश ठेवण्यात आला .

यावेळेस अध्यक्ष डॉ संजय देवकर यांनी तरुण पिढी ला हा उपक्रम प्रेरणादायी आहे असा उल्लेख केला, प्राचार्य संपतराव सूर्यवंशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना मातीसोबत सेल्फी काढून हा उपक्रम संपूर्ण क्षमतेने राबवा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे यांनी केले

रीटायर्ड फौजी यांनी प्रथम माती हातात घेऊन सेल्फी काढून या उपक्रमाचे उदघाटन केले यानंतर सर्व मान्यवर व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सेल्फी काढले . उदघाटन समारोपानंतर सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सेल्फी काढून महाविद्यालयाच्या गूगल लिंक वर अपलोड केले.

यावेळेस या उपक्रमाचे उदघाटन करण्यासाठी काही मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री भारत खोमणे, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इजि. चे प्राचार्य श्री संजय देवकर सर , रिटायर्ड फौजी श्री ताकवले सोमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संपतराव सूर्यवंशी , उपप्राचार्य श्री धनंजय बनसोडे व रासेयो समिती सदस्य, इतर प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026