बारामती ! माळेगाव पोलीस ठाणे कडुन नागरीकांचे हरविलेले १ लाख १२ हजारांचे एकुण ६ मोबाईल परत , पोलीस स्टेशनचे मोबाईल मालकांनी मानले आभार. 

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन त्या नागरीकांना परत करणेसंदर्भात पोलीस अधीक्षक अंकित गोयल (भा.पो.से) , पुणे ग्रामीण यांचे सुचना व मार्गदर्शनाचे अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस दल मधील माळेगाव ठाणे हददीतुन नागरीकांचे हरविलेले मोबाईल बाबत माळेगाव पोलीस स्टेशन प्राप्त तकारींच्या अनुषंगाने माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांचे कडील सायबर पोलीस ठाणे यांचेकडे पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन प्राप्त माहीतीचे तांत्रिक विश्लेषण केलेनंतर खालील नागरीक १ ते ६ यांचे एकुण १,१२,०००रू चे एकुण ०६ मोबाईलचा महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणांहून शोध घेवुन माळेगाव पोलीस स्टेशन येथे प्राप्त करुन दि.१०/१०/२०१३ रोजी पोलीस निरीक्षक किरण अवचर सो. यांचे हस्ते मुळ तक्रारदार यांना परत करण्यात आले .

१) दिलीपकुमार दादासो घुले रा. खताळपटटा ढेकळवाडी ता. बारामती जि.पुणे

२) तुषार भगवान कोकरे रा. म्हसोबानगर मानाप्पावस्ती ता. बारामती जि.पुणे

३) अजय शिवाजी विरकर रा. कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा

४) सचिन तुकाराम कोरपड रा. पणदरे ता. बारामती जि. पुणे

५) प्रविण लक्ष्मण टाक रा. माळेगाव बु ता. बारामती जि.पुणे

६) सुशांत कृष्णाथ तारळेकर रा. माळेगाव बु ता. बारामती जि. पुणे

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल (भा.पो.से) , पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, प्रविण खानापुरे सायबर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण, किरण अवचर, पोलीस निरीक्षक माळेगाव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग माळेगाव पोलीस स्टेशन यांनी केलेली असुन सदर कामी सायबर पोलीस ठाणे पुणे ग्रामीण यांचेकडील पोलीस नाईक महेश कोळी यांनी सहकार्य केलेले आहे. नागरीकांचे हरविलेले किंमती मोबाईल हे माळेगाव पोलीस स्टेशन कडुन शोध घेवुन मुळ मालकांना परत मिळाल्याने मोबाईल मालक यांनी समाधान व्यक्त करुन माळेगाव पोलीसांचे आभार मानले.

माळेगाव पोलीस स्टेशन कडुन माहे मे २०२३ ते आजपावतर एकुण ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचे नागरीकांचे हरविलेले एकुण २६ मोबाईल शोधुन परत देण्यात माळेगाव पोलीस ठाण्याला यश आले आहे .