प्रतिनिधी
बारामती T.C. कॉलेज रोडवर अंडा भुर्जी विक्री करणारा शाहबाज रौफ पठाण वय 32 वर्षे रा. सद्गुरु नगर पाटस रोड ता. बारामती जिल्हा पुणे हा रात्रीचे वेळी अंडा भुर्जी गाडी लावून विक्री करीत असताना त्यास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने गंभीर जखमी केलेबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु रजि क्र 766/23 भादवि 307 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. जखमी इसमावर बारामती येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये औषध उपचार चालू असताना तारीख ०८/१०/२०२३ रोजी मयत झाला होता.
बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी गुन्हा दाखल झाले नंतर यातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता ४ पोलीस पथक तयार केले होते.
बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार दशरथ इंगोले व अक्षय सिताप यांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गुन्हा घडले ठिकाणी आजूबाजूला असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज व ह्यूमन सोर्सेसच्या मार्फतीने समांतर तपास करून एक इसम यातील मयत शहाबाज पठाण यास दारूचे नशेत फुकट अंडी देण्याबाबत वाद घातल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे माहिती काढून प्रवीण भानुदास मोरे वय 36 रा. कल्याणी नगर तांदुळवाडी ता. बारामती जिल्हा पुणे यास ताब्यात घेऊन त्याचे कडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने बारामती शहर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक अंकीत गोयल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे सो बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो. बारामती विभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे बारामती शहर पोलीस स्टेशन,तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार,गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, अभिजित कांबळे,दशरथ इंगोले, अक्षय सीताप, दादा जाधव, सागर जामदार, शाहू राणे यांनी केलेली आहे.
व्यावसायिक तसेच इतर लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत माहिती असल्यास तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा किंवा 112 या आपत्कालीन नंबरवर माहिती द्यावी असे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी आवाहन केले आहे.