मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील जि.प प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप.

mnewsmarathi 13 Oct 2023 1 मिनिट वाचन 8,655 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

          बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर 1 व 2 या शाळेतील मुलांना ओळखपत्र व खाऊ वाटप कार्यक्रम बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्ह्याचे संघटक व ढगाई फॉर्मचे प्रमुख पांडुरंग घळगे यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होळ गावठाणच्या सरपंच छाया भंडलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवकध्यक्ष नानासाहेब मदने होते.

 यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले,राहुल आगम सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे ,सोनू खोमणे युवा उद्योजक नंदूशेठ जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल जाधव, जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्ह्याच्या महिला संघटिका अलका भंडलकर, तालुका महिला सचिव सुनिता घळगे , विशाल साळवे ,समीर आतार ,जीवन राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी, प्रास्ताविक अमोल गायकवाड तर आभार जाधव मॅडम यांनी मानले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi