सातारा ! कंत्राटीकरणाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन. 

माझा जिल्हा

प्रतिनिधी- फिरोज भालदार

राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे . हा निर्णय लोकवीघातक असून तो तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्याचे विविध विषयांतर्गत सर्व सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय उद्योग ,ऊर्जा आणि खनीकर्म विभागाने घेतला . याची अंमलबजावणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सुरू झाली आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने नऊ कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्या सर्व कंपन्या भाजप आमदार व सरकार प्रेरित आहेत . त्यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान होऊ शकते. कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा योजनांच्या नावावर बंद करण्याचा दुर्दैव निर्णय सरकारने घेतला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी करत असल्याचा निर्णय घेतलेला आहे . आरोग्य विभागाचे कंत्राटीकरण करण्याचा दुर्दैव निर्णय असून संभाजी ब्रिगेडने त्याला तीव्र विरोध नोंदवत निषेध व्यक्त केला.

 यावेळी जिल्हाध्यक्ष रफिक शेख, तेजस्विनी केसरकर , संतोष मालुसरे ,मेहबूब पठाण, ॲड . वनिता भोसले पाटील , पूजा सावंत ,शौकत शेख, सुजित दगडे आदी उपस्थित होते.