भारतीय युवा पँथर संघटनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम काऱ्हाटी येथे संपन्न

सामाजिक

प्रतिनिधी

बारामती: भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या बारामती तालुक्यातील पहिल्या शाखेची स्थापना काऱ्हाटी गावात करण्यात आली.

शाखेचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या काऱ्हाटी शाखेच्या अध्यक्षपदी अजय लोणकर उपाध्यक्ष शिवाजी खंडाळे, उपाध्यक्ष मयूर लोणकर , कार्याध्यक्ष लक्ष्मण खंडाळे , सहकार्याध्यक्ष दादासो खंडाळे , सरचिटणीस नंदकुमार खंडाळे , संघटक बापूराव खंडाळे शाखा सदस्य :- अरुण मोरे , साहेबराव गार्डी,स्वप्नील खंडाळे महिला सदस्य सौ ज्योती खंडाळे सौ वैशाली खंडाळे सौ अश्विनी थोरात निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.बी. के.जाधव माजी.सरपंच ग्रामपंचायत काऱ्हाटी, तंटामुक्ती उपाध्यक्ष राजेंद्र खंडाळे, त्रिंबक चांदगुडे, बी.के लोणकर सर , हनुमंत मोरे कुंडलिक खंडाळे,शेखर खंडाळे , विठ्ठल लोणकर , दत्ता लोणकर ,नंदकुमार चांदगुडे ,कालिदास वाबळे ,अरविंद वाबळे, निलेश ढमाळ , विकास चांदगुडे , महादेव खंडाळे,पत्रकार बाळासाहेब वाबळे उपस्थित होते.

भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गणेश थोरात पुणे जिल्हाध्यक्ष अस्लम शेख, बारामती तालुकाध्यक्ष महिला सौ. वंदना गायकवाड , बारामती तालुका सरचिटणीस महिला सौ. सोनाली जाधव , बारामती शहराध्यक्ष निखिल (भाई) खरात, बारामती शहर संघटक समीर खान , बारामती शहर सदस्य अनिकेत यादव उपस्थित होते.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे सांगितले की भारतीय युवा पॅंथर संघटना शोषित, पीडित ,वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करते. सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी भारतीय युवा पॅंथर संघटना काम करते. लवकरच गाव तिथे शाखा उपक्रम संघटनेच्या वतीने राबविणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.