ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न

माझा जिल्हा

प्रतिनिधी

बारामती -: मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहराप्रमाणे बारामती सुद्धा नवनवीन संकल्प घेऊन वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते उपक्रम “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित (दादा) पवार” यांच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी बारामती मध्ये राबवल्या आहे. नेहमी दादा बारामतीचा विकास तसेच महाराष्ट्राचा विकास देखील करण्याचा प्रयत्न व नवनवीन गोष्टी महाराष्ट्रत तसेच बारामतीत राबवण्याचा प्रयत्न करतात . त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांची भाचे व आरोग्य सहायक, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नागरिकसंघ बारामती शहर उपाध्यक्ष मा. श्री.लक्ष्मण बगाडे यांचे नातू कु.रोहन सोनवणे यांनी “ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी “या नावाने ऑफिस बारामतीकरांच्या सेवेसाठी सुरू केले आहे.

 त्यामध्ये “वेलकम एन्ट्री ला लागणारे नवीन अपडेट चे उपकरणे , एलईडी लाईट, बाहुबली रथ, मटकी, कोल्ड प्यारो, बबल मशीन, स्मोक मशीन, पेपर ब्लास्ट मशीन, तसेच एक ना अनेक साहित्य, तसेच साऊंड सिस्टीम “तसेच वाढदिवसासाठी मुला – मुलींच्या लग्नासाठी लागणारे सर्व प्रकारचे इव्हेंटचे साहित्य एका छताखाली ते म्हणजे “ओम साई इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी” स्थापन केली.

 असून याचे उद्घाटन” महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री अजित (दादा) पवार साहेब ” यांच्या हस्ते रविवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 2:30वाजता “इनामदार कॉर्नर, देशमुख चौक,पाटस रोड, “बारामती या ठिकाणी करण्यात आले.

 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या सत्कार “जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे शांततेचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती व बौद्ध वृक्ष ” देऊन बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे तसेच त्यांचे भाचे रोहन सोनवणे बारामती लाईव्ह चे कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल कुमार बागुल ( सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली, हायकोर्ट मुंबई) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.

 तसेच या सुंदर अशा उद्घाटन प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री “अजित(दादा) पवार “यांनी शुभेच्छा देत असताना बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांचे व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक देखील केले.

 तसेच रोहनला व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन व सल्ले दिले.

याप्रसंगी बारामती तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ‘संभाजी (नाना )होळकर” देखील उपस्थित होते तसेच बारामती लाईव्ह कायदेशीर सल्लागार ॲड. अनिल कुमारजी बागुल ( सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली, मुंबई हायकोर्ट ), तसेच माजी शहराध्यक्ष नितीन शेंडे, खरेदी विक्री संघाचे” बापू (सरपंच )गवळी”, बिल्डर असोसिएशनचे खराडे साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष टी.व्ही.मोरे दादा, सामाजिक कार्यकर्ते विशाल खंडाळे,”( गणेश डी.जे)चे मालक गणेश गवळी”,बिल्डर सावंत साहेब(पुणे ), “हमारा विश्व फाउंडेशनच्या संस्थापिका अनिता अग्रवाल”, भट्टू पाटील(पुणे ), अस्लम शेख, बारामती लाईव्हचे सहसंपादक रमीज जादगार, बारामती लाईव्ह चे प्रतिनिधी भीमराव कांबळे, पत्रकार स्वप्निलजी कांबळे, पत्रकार संदीपजी साबळे, पत्रकार विकासजी कोकरे, पत्रकार वसंतजी मोरे, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडियाचे पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच मित्रपरिवार व पै-पाहुणे देखील उपस्थित मोठ्या संख्येत होते .

 तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सावळे पाटील यांनी अत्यंत सुंदर असे सूत्रसंचालन केले. त्यांचे देखील आभार

 तसेच कार्यक्रमाचे फोटोग्राफी ओम साई फोटो शॉप चे मालक विशाल साळुंखे हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील अत्यंत सुंदर फोटो टिपले त्यांचे देखील आभार.

 अशाप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री अजित(दादा )पवार साहेब यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल बगाडे परिवारातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार.