हवाई दलामध्ये करिअर करण्याची मुलींनाही संधी- विंग कमांडर रवि सचिन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

सोमेश्वरनगर – हवाई दलामध्ये करिअर करण्याची मुलींनाही संधी आहे, तसेच एन.डी.ए. मधील मुलींची पहिली बॅच आत्ता प्रशिक्षण घेऊन बाहेर पडेल अशी माहिती विंग कमांडर रवि सचिन यांनी सांगितली.

        मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘हवाई दलात करिअरची संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विंग कमांडर रवि सचिन बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सचिव श्री. सतीशराव लकडे होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप, व्यवस्थापन समिती सदस्या सौ.सुजाता भोईटे, पर्यवेक्षिका जयश्री सणस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, तसेच सोमेश्वर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, सह्याद्री पब्लिक स्कूल व उत्कर्ष आश्रम शाळा व जुनिअर कॉलेज मधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

     पुढे भरती प्रक्रियेबद्दल बोलताना ते म्हणाले आता विद्यार्थ्यांची ‘अग्नी वीर वायुसेना’ म्हणून निवड केली जाते व त्यांना चार वर्षे प्रशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे हवाई दलामध्ये भरती होण्यासाठी अवांतर वाचन असणे गरजेचे आहे, त्यासाठी दररोज मराठी, इंग्रजी वृत्तपत्रे यांचे वाचन केले पाहिजे. तसेच चालू घडामोडींचे ज्ञान अद्यावत ठेवणे आवश्यक आहे. तसेच धावणे, पुश-अप्स, स्क्वॉट यासारखे शारीरिक क्षमता विकसित करणारे व्यायाम प्रकार गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व असणे आवश्यक आहे, अशा अनेक विषयांवर त्यांनी विचार मांडले व शेवटी व्हिडिओ व ऑडिओच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी करून प्रश्नमंजुषा द्वारे संवाद साधला व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांना माहिती पुस्तकांच्या स्वरूपामध्ये बक्षीसे दिली.

       या मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

        अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री.लकडे सरांनी पाहुण्यांचे स्वागत करून या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप यांनी केले.

         या व्याख्यानाचे नियोजन प्रा. रवींद्र होळकर यांनी केले, तसेच सूत्रसंचालन प्राध्यापिका सारिका होळकर यांनी केले तर आभार प्रा.राजेंद्र गायकवाड यांनी मानले.