वाघळवाडी येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण भोसले यांची निवड

माझा जिल्हा

प्रतिनिधी

वाघळवाडी ता.बारामती येथील ग्रामपंचायतीच्या मधील तंटामुक्ती समितीची निवड नुकतीच पार पडली. वाघळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण शिवाजी भोसले यांनी निवड झाली.तसेच समितीच्या पदी विविध प्रतिनिधीची निवड यावेळी ग्रामसभेत करण्यात आली.

    तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी तीनजणांचे अर्ज आले होते. यामध्ये सुचिता जगन्नाथ साळवे यांनी निवडणुकीतुन माघार घेतल्याने दोन जणांचे अर्ज निवडीसाठी राहिले. अध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी आपली  ग्रामसभेत मते मांडली तसे प्रयत्न करण्यात आले. परंतु कोणाची निवड करायची हे निश्चित होत नसल्याने  बाळकृष्ण भोसले आणि विकास सावंत यांच्यामध्ये निवडणूक पार पडली. ग्रामसभेस जवळपास २००हुन अधिक ग्रामस्थ,युवक,महिला  उपस्थित होते.  बाळकृष्ण शिवाजी भोसले यांना १०७ मते मिळाली तर विकास पोपट सावंत यांना ६४ मते मिळाली. ४ मते बाद झाली. या झालेल्या निवडणूकित विकास सावंत यांचा पराभव झाला तर बाळकृष्ण भोसले यांचा विजय होऊन त्यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली.  ग्रामविकास अधिकारी संजयकुमार भोसले यांनी निवडीसाठीचे कामकाज पार पडले. निवडीनंतर सरपंच हेमंत गायकवाड, उपसरपंच गणेश जाधव,सदस्य जितेंद्र सकुंडे, तुषार सकुंडे, विशाल हंगिरे,निशा सावंत, चेतनकुमार सकुंडे, सुजित सावंत, किरण गायकवाड, दादु मांगडे,संभाजी भुजबळ आदींनी अभिनंदन केले.