केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

माझा जिल्हा

प्रतिनिधी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरुन योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत अंतर्गत हवामान आधारित फळ पिक विमा योजनेमध्ये आंबिया बहार २०२३-२४ साठी केळी पिकाचा विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ ही होती. ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ४५ हजार ७३१ अर्जदारांनी केळीसाठी विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे काही केळी उत्पादक शेतकरी वेळेत या योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत.

अशा शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली होती. त्यानुसार केंद्र शासनाने ही मुदतवाढ दिल्याचे राज्याच्या कृषी आयुक्तालयाने कळविले आहे.