निंबुत येथील सातशे गरजू कुटुंबियांना मोफत साखर वाटप करीत अभिजीत काकडे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा.

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 निंबुत येथे सोमेश्वर चे संचालक श्री अभिजीत राव काकडे यांच्या माध्यमातून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना तर दिवाळीनिमित्त हिंदू, मुस्लिम, समाजातील इतर व गरजू कुटुंबीयांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साखर वाटप करीत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 या निमित्ताने पुन्हा आज स्वर्गीय बाबालाल जी काकडे यांच्या आठवणी ताज्या झाल्या खरंतर काहीतरी गरजू व्यक्तींना देण्याची परंपरा स्वर्गीय बाबालाल जी काकडे यांनी सुरू केली त्यांच्या पश्चात त्यांचे वैचारिक वारसदार श्री सतीश राव काकडे यांनी ती जोपासली व तीच परंपरा श्री अभिजीत काकडे यांनी चालू ठेवली आहे. यावेळी नागरिकांना अभिजीत काकडे यांच्याकडून असेही आवाहन करण्यात आले की प्रदूषण मुक्त व ध्वनीमुक्त दिवाळी साजरी करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. अभिजीत काकडे हे नेहमीच शैक्षणिक क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना देखील आपल्या माध्यमातून मदत करीत असतात असे देखील उदगार काही विद्यार्थ्यांकडून यावेळी बोलण्यात आले.