बारामती ! कोऱ्हाळे बुद्रूक येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध दर वाढीसाठी साखळी उपोषण ; उपोषणकर्ते यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा . 

माझा जिल्हा

प्रतिनिधी- फिरोज भालदार

 बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी दुधाला वाढीव दर मिळावा , हमीभाव मिळावा या मागणीसाठी कोऱ्हाळे बुद्रुक गावातील व पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु आहे . या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दूध उत्पादक उपोषणकर्ते यांच्या मागण्या अशा आहेत की दुधाला वाढीव दर, हमीभाव मिळावा , जनावरांना अल्प दरात विमा कवच मिळावे , दूध भेसळी विरोधात पथक तयार करावे , जनावरांची औषधे चारा बियाणे मुबलक व त्यावर अनुदान मिळावे, पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुणवत्ता व किमतीवर शासनाचे नियंत्रण असावे, यावर्षी पावसामुळे दुष्काळ पडला असून चारा छावण्या सुरू करण्यात याव्या आशा या मागण्यांसाठी कोऱ्हाळे बुद्रुक येथे साखळी उपोषण चालू आहे.

  या साखळी उपोषणाला कोऱ्हाळे बुद्रुक, माळशिकारेवाडी ,थोपटेवाडी, कुरणेवाडी ,माळवाडी, शिरसणे ,लाटे ,बजरंगवाडी , कोऱ्हाळे खुर्द, वडगाव निंबाळकर ,लोणी भापकर ,मुढाळे, सायंबाचीवाडी ,जळकेवाडी ,महांगरेवाडी , खामगळवाडी या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वमर्जीने हे साखळी उपोषण सुरू केले असून हे साखळी उपोषण १६-११-२०२३ ते २०-११-२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ याप्रकरे हे साखळी उपोषण चालू आहे.

 उपोषणाला वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक सचिन काळे यांनी भेट दिलेली आहे व उपोषणाबद्दल वेळोवेळी आम्ही प्रशासनापर्यंत माहिती देत आहोत असे उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगण्यात आले .या उपोषणा ठिकाणी पोलीस प्रशासन यांनी जाऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे असे उपोषणकर्त्यांकडून बोलताना सांगण्यात आले आहे. जर २० तारखेपर्यंत प्रशासनाने काही तोडगा न काडल्यास २१ तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत असे उपोषणकर्ते यांनी सांगितले .