मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’सारखा थरार! तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करून खून

mnewsmarathi प्रतिनिधी
November 20, 2023 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करून त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. सिद्धार्थचे काही जणांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाले होते. या वादातून काही जणांनी त्याचा कोयते घेऊन पाठलाग केला. जीव वाचवण्याच्या भीतीने सिद्धार्थ हा पुण्यातील गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. मात्र, आरोपींनी त्याला त्या ठिकाणी गाठून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात सिद्धार्थ हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी काही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

 

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा