सोमेश्वर च्या व्हा. चेअरमन पदाच्या निवडीसाठी विलंब का.?

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पार पडल्यानंतर प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळावी या हेतूने पाच वर्षात पाच व्हाईस चेअरमन देण्याचे ठरले त्या सूत्राने दरवर्षी एक नवीन व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास मिळतो मात्र विद्यमान व्हाईस चेअरमन यांनी 24 तारखेलाच आपल्या व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे मग अद्यापही नवीन व्हाईस चेअरमन ची निवड का करण्यात आली नाही अशी चर्चा सभासद वर्गामधून होत आहे.

 व्हॉइस चेअरमन पद मलाच मिळावे यासाठी अनेक संचालकाने देव पाण्यात ठेवल्याचे देखील सभासदांच्या चर्चेतून समजत आहे त्यामुळेच सोमेश्वर च्या नवीन व्हाईस चेअरमन च्या निवडीबाबत निर्णय घेण्यास विलंब लागत आहे का?

 की येणाऱ्या लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून व्हा.चेअरमन पदाची निवड करायची आहे अशी देखील चर्चा परिसरामध्ये रंगू लागली आहे.

 व्हॉइस चेअरमन पदासाठी कोणाच्या नावाचा शिक्का मोर्तब होणार हे येणाऱ्या संचालकांच्या मासिक मीटिंगमध्ये तरी फायनल होणार का?