मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

पुरंदर! जवळाअर्जुन येथे बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिने चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

mnewsmarathi प्रतिनिधी
January 11, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी –

जवळाअर्जुन ता. पुरंदर जि.पुणे येथे बंद घराचे कुलूप तोडून एकूण २,४७,१०० रुपये च्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकम अज्ञात चोरट्याने चोरून न्हेल्याचे समोर येत आहे .

मिळालेल्या माहिती खालील प्रमाणे –

 दि. ११ जानेवारी २०२४ रोजी रात्री १.३० ते ३.५२ वा.चे दरम्यान जवळार्जुन ता. पुरंदर जि. पुणे येथे फिर्यादी जालिंदर मुरलीधर टेकवडे रा. जवळार्जून यांचे राहते घरातून अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेली

७५,००० रू गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचा लक्ष्मी हार,

७५,००० रू गळ्यातील तीन तोळे वजनाचा सोन्याचे गंठण ,

३७,५०० रू १७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ,

७५०० रू ०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील डूल ,

२५००० रू कानातील एक तोळा वजनाचे सोन्याचे टॉप्स ,

९००० रू ३० भार वजनाचे चांदीचा कमरपट्टा ,

४५०० रू ३० भार वजनाचे चांदीचा पंचारती ,

३६०० रू १२ भार वजनाचे चांदीच्या पट्ट्या ,

५००० रुपये रोख रक्कम

५००० रुपये रोख रक्कम (रणजीत सोपान टेकवडे )यांची असे एकूण २,४७,१०० रुपये चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली असून याविरुद्ध जेजुरी पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम ४५७,३८०,५११ गुन्हा दखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोसई गावडे हे करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा