संपादक मधुकर बनसोडे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळजवळ तीन महिने संपत आले तरीही सोमेश्वरच्या सभासदांचा आडसाल्या 265 जातीचा ऊस वाड्यातून तुरा टाकून शेतात आहे तसाच उभा आहे.
सोमेश्वरचा गळीत हंगाम सुरू होताच सोमेश्वरच्या कारभाऱ्यांनी गेट-किन धारकांचा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे नियोजन केले? त्यामुळे सोमेश्वर च्या सभासदांवरती अन्याय झाल्याची भावना सोमेश्वरचे ऊस उत्पादक मालक शेतकरी बोलत आहेत.
सोमेश्वरच्या कारभाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून उशिरा तुटणाऱ्या उसासाठी अनुदान जाहीर केले खरे मात्र ऊसतोड उशिरा झाल्यामुळे एकरी 15 ते 20 टन टनेज घटणार आहे त्यामुळे या अनुदानाचा काहीही उपयोग होणार नाही उलट यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटाच होणार असल्याची चर्चा सोमेश्वरच्या सभासदांमधून होत आहे.
ज्यांच्या भरवशावर ती कारखान्याची एक हाती सत्ता कारभाऱ्यांकडे सोपवली त्या भरोश्याची राख रांगोळी केल्याच्या चर्चा सभासदांमधून होत आहेत. आता ज्यांना संचालक म्हणून आम्ही निवडून दिलं ते फक्त मासिक मीटिंगमध्ये मिरवण्याकरताच का? आमच्या उसाच्या पार खोडक्या झाल्या तरी तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नसाल तर सभासदांचे खरे प्रतिनिधी म्हणून आपण सत्तेतून राजीनामा देऊन पाय उतार व्हावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये सभासद आपल्याला देखील माफ करणार नाही.
राज्यात एक नंबरचे गळाप करण्याच्या हट्टा पायी सोमेश्वरच्या सभासदाचाच बळी का?