बारामती ! वडगाव निंबाळकर जि. प. प्राथमिक शाळा नं १ व २ चा आनंद बाजार उत्साहात संपन्न . 

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.१ आणि २ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद बाजारनिमित्त गल्ली ते दिल्ली खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. प्राथमिक शाळा नं १ व २ आनंद बाजाराचे उदघाटन वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनिल ढोले व सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्रआप्पा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .

यावेळी उपसरपंच संगितभाभी शहा, ग्रामपंचायत सदस्य राहुल आगम, मोहन बनकर, सदस्या सारिका खोमणे, प्रेमलता रांगोळे, मिनाक्षीकाकी ढोले, शा. व्य. समिती अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष सुशीलकुमार अडागळे, जीवन राऊत, मुख्याध्यापिका कविता जाधव, अरुणा आगम, सर्व शिक्षक, सदस्य समीर आतार, स्वप्निल शिंदे, मोहिनी साळवे, पै. नानासाहेब मदने, जितेंद्र पवार, अनिल खुडे, मंगेश खोमणे , सुनील खोमणे , विक्रम साळवे , निलेश साळवे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या व्यवहारज्ञानात वाढ होण्याच्या उद्देशाने भाजीपाला, फळभाज्या, इडली सांबर,डोसा, पॅटिस,पाणीपुरी,पुरीभाजी,दहिवडे,वडापाव,भजी,थालीपीठ, बीर्याणी यासारखे रुचकर पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणले होते. पालकांनी मुलांची मदत करत हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे हसत खेळत पार पाडला .

 विद्यार्थ्याना या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवाण घेवाण व्यवहार कश्या प्रकारे केली जाते याचे ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या आनंद बाजाराचा आस्वाद घेण्यासाठी वडगाव निंबाळकरमधील ग्रामस्थ, पालक, पदाधिकारी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व स्वातंत्र्य विद्या मंदिर चे विद्यार्थी यांनी खरेदी करत आनंद लुटला. आनंद बाजार या उपक्रमाचे पालकांकडून व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले .