• Home
  • माझा जिल्हा
  • आयोध्या येथील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमेश्वर येथे अभिषेक.
Image

आयोध्या येथील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमेश्वर येथे अभिषेक.

प्रतिनिधी.

आयोध्या येथील रामलला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान करंजे येथे मा.श्री संभाजीनाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बारामती, मा.श्री भाऊसाहेब हूंबरे लोकनियुक्त सरपंच करंजे यांच्या शुभहस्ते अभिषेक करण्यात आला.सोमेश्वर देवस्थान येथे आज दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.दुपारी व संध्याकाळी महाप्रसाद तसेच किर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.सोमेश्वर देवस्थान पुरोहित वेदश्री विनायक शास्त्री परांजपे,व मुकेशकाका भांङवलकर , मोहनराव भांङवलकर, बाळासाहेब भांङवलकर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी आसे आवाहन वेदश्री विनायक शास्त्री परांजपे यांनी केले आहे.या प्रसंगी निरा बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे,करंजे गावचे उपसरपंच सचिन पवार,करंजेपूल गावचे माजी उपसरपंच निलेश गायकवाड, करंजे ग्रामपंचायत सदस्य अशोक होळकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चेअरमन प्रताप भांङवलकर, सचिव संतोष भांङवलकर व परिसरातील ग्रामस्थ व भाविक बहूसंख्येने उपस्थित होते.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026