प्रतिनिधी – फिरोज भालदार
‘ एम न्यूज मराठी ‘ ने १९ डिसेंबर २०२३ रोजी (होळ) सस्तेवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने व त्या रस्त्यावरून गाड्यांची मोठी वर्दळ असून तो रस्ता जास्त प्रमाणात वापरण्यात येत असतो व त्या रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने अपघात होत होते म्हणून बातमी प्रसारित केली होती . या बातमीची दखल घेत सस्तेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने सस्तेवाडी रस्त्यांवर असलेले सर्व खड्डे भरून घेऊन त्या ठिकाणी रस्ता डांबरीकरण करून नीट करण्यात आला आहे .
रस्त्यावरील खड्डे भरून घेतल्याने त्या ठिकाणाहून वाहतूक करत असताना रस्त्यांवरील खड्यांमुळे जी त्या ठिकाणाहून वाहतूक करत होते त्यांना अडचनिंना सामोरे जाऊन त्या रस्त्यावरून जावे लागत होते आता कुठल्याही प्रकरची अडचण होणार नाही व ह्या रस्त्याचे काम ‘ एम न्यूज मराठी ‘ ने बातमी प्रसारित केल्याने झाले आहे त्यामुळे सस्तेवाडी ग्रामस्थांनी व प्रवाशांनी ‘ एम न्यूज मराठी ‘ चे आभार मानले .