जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न.

माझा जिल्हा

 प्रतिनिधी

जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने संपन्न. गणेश वंदना, देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जिवनातील वरील गीते,सिनेगितावरील नृत्य सादर करून विध्यार्थी वर्गानी उपस्थित मंङळींची मने जिंकली. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी कलागुण सादर करण्याची पर्वणीच आसते. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते.त्याव्दारे विध्यार्थातील सुप्त कलागुणांना वाव मिळतो.विध्यार्थांची अभिनय क्षमता पाहून पालकांनीही देखील उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवून दाद दिली.सर्व उपस्थित ग्रामस्थ महीला वर्गाचा आनंद व्दिगुणीत झाला.ग्रामस्थांनी बक्षीसांची उधळण करून विध्यार्थाना प्रोत्साहन दिले.विध्यार्थांनी मेकप, वेशभूषा अतिशय सुंदर केली होती.स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शेंङकरवाङीतील महिला वर्गानी केले..या कार्यक्रमास नृत्य दिग्दर्शक सुरज शिंदे लाभले.अतिशय सुंदर ङान्स बसवून कार्यक्रमास शोभा आणली.शाळेचे शिक्षक सतिशराव पिसाळ, हंसा वायाळ, अंगणवाङी शिक्षिका रेश्मा शेंङकर, मदतनीस मीनाक्षी बङेकर व उत्कृष्ट नियोजन समिर (गुंङा) शेंङकर,श्रीकांत शेंङकर,मयुर जालिंदर शेंङकर, पै अजय शेंङकर यांनी केले.या कार्यक्रमास उत्कृष्ट साऊंङ सिस्टीम व लाईट ङेकोरेशन अजित कोळपे यांनी केले.तसेच फोटोग्राफर मुस्कान फोटो स्टुडिओ करंजेपूल, पापा मुलाणी होते.नृत्यदिग्दर्शक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा मानसन्मान महेश शेंङकर संचालक करंजे पतसंस्था, शिवाजीराव शेंङकर सामाजिक कार्यकर्ते, राहूल शेंङकर संचालक करंजे सोसायटी, प्रदिप शेंङकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती, उधोजक चांगदेव धुर्वे, निखिल शेंङकर सदस्य ग्रामपंचायत करंजेपूल, सौ अरुणाताई शेंङकर सदस्या ग्रामपंचायत करंजेपूल, सोनल गायकवाड सदस्या ग्रामपंचायत यांनी केला.