• Home
  • माझा जिल्हा
  • आंबेगाव ! महाळुंगे पडवळ मध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्याक्षिक. 
Image

आंबेगाव ! महाळुंगे पडवळ मध्ये कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्याक्षिक. 

प्रतिनिधी

महाळुंगे पडवळ(ता.आंबेगाव) येथे कृषीकन्या शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देण्याचे काम करत आहेत .

बियाण्यांची बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे असते. एखाद्या लहान बाळाचे लहाणपणीच लसीकरण केले जाते. त्यामुळे विविध आजारांपासून त्याचे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यांपासून होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते. बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो.

याचेच प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय,आंबी (ता.मावळ) येथील विद्यार्थीनींनी बीजप्रक्रिया करण्याचे प्रात्याक्षिक शेतकरी बांधवाना करून दाखविले .कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ह्या विद्यार्थीनी तीन महिने महाळुंगे, पडवळ येथे मुक्कामी राहून शेतीबाबत मोफत प्रात्यक्षिक देणार आहेत.

अशी माहिती महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश खरे व कार्यक्रम अधिकारी सौ.चेतना नायकरे यांनी दिली. कृषीकन्या स्नेहा पाटील,साक्षी गलांडे,विशाखा शिवले,वैष्णवी शिवले,अंजली माने,प्रेमज्योती ठोंगे यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करन्याचे आवाहन केले.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026