हॉटेल व्यवसायिकास कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागणारा कुख्यात गुंड गजाआड

क्राईम

प्रतिनिधी

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कारवाई

 बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील आशीर्वाद हॉटेलचे मालक फिर्यादी दीपक चंद्रकांत राऊत रा.मोतीबाग इंदापूर रोड बारामती. जिल्हा पुणे यांना दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी सचिन पाथरकर रा.आमराई, बारामती . जिल्हा पुणे .याने फिर्यादी यांचे आशीर्वाद हॉटेलमध्ये येऊन कोयत्याचा धाक दाखवून खंडणीची मागणी केली. व फिर्यादीस असे धमकवले की तू या आधी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे .खंडणी काय असते तुला दाखवतो . दर महिन्याला मला तू 15,000 रुपये हप्ता द्यायचा नाहीतर मी तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे ठार मारून टाकेल .अशी धमकी दिले वरून बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 30 /24 भादवि कलम 452, 385, 387 ,504, 506 आर्म अॅक्ट कलम 4 (25) अन्वये दिनांक 18 /1/ 2024 रोजी गुन्हा दाखल आहे.

तेव्हापासून सदर आरोपी हा फरार होता त्यास मोठ्या शितापीने गोपनीय बातमीदाराच्या मदतीने बारामती तालुका पोलीस यांनी दिनांक 28 /1/ 2024 रोजी सम्राट हॉटेल समोर बारामती येथे पकडले. त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती . यांनी *14 दिवस मॅजेस्टेट कस्टडी सुनावली आहे.

आरोपी सचिन पाथरकर रा.आमराई बारामती .याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 196/2021भा. द.वि.कलम 385,323,504

2) बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 204/2021 भा. द.वि.कलम 353,225,504,506

3) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.322/12 भादवी कलम 379

4) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र. नं.167/15 भादवि कलम 143,147,148,323

5) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 76/15 भा द वि कलम 452,324

6) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र. नं. 163/19 भादवी कलम 394,34

7) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.145/20 भादवि कलम 392,504,506

8) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र. नं.323/21 भादवी कलम 394

9) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.425/22 भादवि कलम 395 ,307,326

10 ) बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र .नं .341/23 भादवि कलम 307,353.

  वरील प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सदर आरोपी वरती दाखल आहेत. सराईत गुन्हेगार असल्याने अटकेस प्रचंड प्रतिकार करीत असताना देखील त्यास अटक करून पुढील तपास चालू आहे

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्रीअंकित गोयल, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे बारामती तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोसई गणेश पाटील . तपास पथकाचे पोलिस अंमलदार श्री राम कानगुडे सहाय्यक फौजदार राजेंद्र जाधव व पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे, दत्ता मदने यांनी केली असून सदर बाबतीत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री गणेश पाटील हे करीत आहेत.