संपादक मधुकर बनसोडे.
सभासदांची ऊसतोड वेळेत होत नसल्यामुळे शनिवारी सोमेश्वर च्या चेअरमन, संचालकांच्या, विरोधात शेतकरी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
मात्र या मोर्चादरम्यान शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी बोलताना असे सांगितले की सोमेश्वर च्या चेअरमनने सभासदांचे खरंच भलं केलं असेल तर त्यांना पिस्तूलधारी पीए का ठेवावा लागतो.
चेअरमन साहेबांच्या या पियेला ऑन ड्युटी पिस्तूल ठेवता येतो का? पीए साहेबांच्या या पिस्तूल ठेवायच्या सवयीमुळे अनेक कामगार देखील भयभीत होत असल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये काही कामगारांमधून देखील होत आहे.
चेअरमन साहेबांचा पिये असल्याचा गैरवापर पीए साहेब करून घेत असल्याची देखील काही कामगारांमधून चर्चा होत आहे.
कदाचित आरटीआय कार्यकर्ता असल्यामुळे चेअरमन साहेबांच्या पीएला पिस्तूल ऑन ड्युटी वापरावा लागेत असेल मात्र कारखान्याचा कणा असणारे कर्मचारी जर भयभीत होत असतील तर चेअरमन साहेब आपल्या पीएला काही बंधन घालणार का?