मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 15 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 03 February 2024 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वरच्या चेअरमन साहेबांच्या पीएकडे का असतो ऑन ड्युटी पिस्तूल? मोर्चादरम्यान अनेक शेतकऱ्यांमधून वेगवेगळ्या चर्चेला उधाण.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 3, 2024 1 मिनिट वाचन 8,505 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक मधुकर बनसोडे.

 सभासदांची ऊसतोड वेळेत होत नसल्यामुळे शनिवारी सोमेश्वर च्या चेअरमन, संचालकांच्या, विरोधात शेतकरी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

 मात्र या मोर्चादरम्यान शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी बोलताना असे सांगितले की सोमेश्वर च्या चेअरमनने सभासदांचे खरंच भलं केलं असेल तर त्यांना पिस्तूलधारी पीए का ठेवावा लागतो.

 चेअरमन साहेबांच्या या पियेला ऑन ड्युटी पिस्तूल ठेवता येतो का? पीए साहेबांच्या या पिस्तूल ठेवायच्या सवयीमुळे अनेक कामगार देखील भयभीत होत असल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये काही कामगारांमधून देखील होत आहे.

 चेअरमन साहेबांचा पिये असल्याचा गैरवापर पीए साहेब करून घेत असल्याची देखील काही कामगारांमधून चर्चा होत आहे.

 कदाचित आरटीआय कार्यकर्ता असल्यामुळे चेअरमन साहेबांच्या पीएला पिस्तूल ऑन ड्युटी वापरावा लागेत असेल मात्र कारखान्याचा कणा असणारे कर्मचारी जर भयभीत होत असतील तर चेअरमन साहेब आपल्या पीएला काही बंधन घालणार का?

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख