बारामती ! वडगांव निंबाळकर येथे आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन.

माझा जिल्हा

प्रतिनिधी –

 आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांच्या १९२ व्या पुण्यतिथीनिमित्त वडगांव निंबाळकर येथे अभिवादन करण्यात आले.

उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. राजे उमाजी नाईक यांना ३ फेब्रुवारी १८३४ पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांना फाशी देण्यात आली. व इतरांना दहशत बसावी म्हनुण इंग्रजांनी उमाजी राजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत च्या काळात राजे उमाजी नाईक यांच्यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श होता.

त्यांना फाशी दिली नसती तर ते दुसरे छत्रपती शिवाजी महाराज झाले असते हे केवळ गौरवद्वार नसून हे सत्य आहे असा ह्या सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी वडगाव निंबाळकर येथे राजे उमाजी नाईक चौकात पुष्पहार अर्पण करून आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 यावेळी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.शिवाजी(मामा)खोमणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्री.हनुमंत खोमणे,मा.उपसरपंच अरविंद खोमणे मा.ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण चव्हाण,जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,रोहन खोमणे,धनंजय चव्हाण,शेखर गिरमे,विजय खोमणे,योगेश खोमणे,गणेश खोमणे निलेश भंडलकर,अनिल खोमणे,अमित खोमणे,संजय खोमणे,पंकज खोमणे,पिटु खोमणे,विजय भंडलकर,योगेश मदने,राजू मदने,विनोद जाधव,संदीप खोमणे सुरज खोमणे,रणजित खोमणे,सार्थक खोमणे,उत्तम खोमणे,उमेश खोमणे,सागर खोमणे आदि पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.