Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
Image

पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी

पोलिसांच्या मोटारीच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रत्नाकर शिंदे (वय ७७, रा. श्रीराम अपार्टमेंट, पोरवाल पार्क, शांतीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायकलस्वार शिंदे विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय परिसरातून निघाले होते. त्यावेळी पोलिसांची माेटार तेथून भरधाव वेगाने निघाली होती. सायकलस्वार शिंदे यांना मोटारीने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. शिंदे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यंच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सुधा चौधरी तपास करत आहेत.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026