मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 5 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

तृतीयपंथियाला बेदम मारहाण, बाजारात नग्न धिंड काढली; ५ ते ६ तृतीयपंथी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

mnewsmarathi 05 Feb 2024 1 मिनिट वाचन 8,767 वाचन

प्रतिनिधी

पोटापाण्यासाठी बाजारातील दुकानात पैसे मागत असलेल्या एका तृतीयपंथियाला इतर ५ ते ६ अनोळखी तृतीयपंथियानी बेदम मारहाण करून त्याचा अंगावरील साडी व ब्लाउज फाडून बाजारात नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील आठवडी बाजारात घडला. आश्विनी उर्फ अमोल हरिभाऊ रेवाडे, वय ३७ वर्षे, रा. सिंधी रेल्वे ता. सेलू, जिल्हा वर्धा, असे फिर्यादी तृतीयपंथीचे नाव असून या निंदनीय प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

अश्विनी अनेक वर्षापासून सिहोरा येथे वास्तव्यास असून परिसरातील आठवडी बाजारात पैसे मागून आपला उदरनिर्वाह करीत होती. शनिवारी सिहोरा येथील आठवडी बाजारात अनोळखी ५ ते ६ तृतीयपंथी रा. सर्व बालाघाट, मध्य प्रदेश यांनी अश्विनीला ‘तू आदमी होकर छक्का जैसा रहता है और हमारी बिरादरी को बदनाम करता है’ असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या अंगावरील ब्लाउज व साडी काढून भर बाजारात तिची नग्न धिंड काढली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालावरून अनोळखी ५ ते ६ आरोपी तृतीयपंथियाविरुध्द सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या तृतीयपंथी आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे तुमसर उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव यांनी सांगितले.

 

लेखक

mnewsmarathi

M News Marathi