मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानकातील बसमध्ये आढळला बॉम्ब

mnewsmarathi 08 Feb 2024 1 मिनिट वाचन 9,127 वाचन

प्रतिनिधी

शहरातील मध्यवर्ती गणेशपेठ बस स्थानकातील अहेरी आगाराच्या बसमध्ये बुधवारी दुपारी १ च्या सुमारास “टिफिन बॉम्ब” आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बस तीन दिवसांपासून याच आगारात उभी होती. काल ती सावनेरला जाऊन आल्याची माहिती आहे. ही माहिती कळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा आणि बीसीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली.

याशिवाय दहशतवादी विरोधी पथकही दाखल झाले तसेच बीडीडीएसची टीम घटनास्थळी दाखल झाली. बॉम्ब सदृश्य टिफीन नष्ट करण्यासाठी सुराबर्डी येथे नेण्यात आला आहे. बॉम्ब सापडल्याची माहिती बाहेर येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi