• Home
  • राजकीय
  • पुण्याच्या लोहगाव विमान तळावरील बहुमजली वाहन तळाचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन
Image

पुण्याच्या लोहगाव विमान तळावरील बहुमजली वाहन तळाचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन

संपादक मधुकर बनसोडे

पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या एरो मॉल या बहुमजली वाहन तळाचे उद्घाटन आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, भारतीय विमानतळ प्राधिकरण चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोहगाव विमानतळाच्या नवीन इमारतीचे आणि कार्गो सुविधेचे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण केले जाईल असे सिंधिया यांनी यावेळी बोलताना सांगितले .

ते पुढे म्हणाले की पुण्यातून बँकॉक विमानसेवा सुरू करण्यात आली असून पुढील महिन्यात थेट सिंगापूर साठी विमानसेवा सुरू करण्यात येईल . पुण्यातून सध्या आठवड्याला 1600 उड्डाणे होतात त्यात वाढ करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . मुंबई प्रमाणेच पुण्याचाही विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले.केवळ देशातीलच नव्हे तर जगातील नवरत्न म्हणून पुण्याचा विकास केला जाईल असे सांगून सिंधिया म्हणाले की , पुणे आणि कोल्हापूर महत्वाची शहरे आहेत . त्यांचा सुयोग्य विकास व्हावा यादृष्टीने अनेकविध उपाय योजना केल्या जातील.

एरोमॉलची वैशिष्ट्येभारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने हा मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.याशिवाय विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.या पार्किंगसाठी प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल. ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.:

तसेच विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.एकंदर ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या जागेत या मॉल ची निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी तर उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर करण्यात आला आहे . इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली असून इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.

Releated Posts

केंद्रात, राज्यात ‘ हिरो ‘ ; बारामतीत मात्र ‘ झिरो’….

प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त.. पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या व जवळपास विरोधी…

ByBymnewsmarathi Feb 11, 2026

राज्यात निवडणुकीचा धडाका! १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला रणसंग्राम

प्रतिनिधी  राज्यातील मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज १२ जिल्हा…

ByBymnewsmarathi Jan 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर ही…

ByBymnewsmarathi Jan 7, 2026

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा – प्रकृती कारणास्तव पदत्याग

प्रतिनिधी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृती कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी…

ByBymnewsmarathi Jul 21, 2025