” समता, बंधुता, न्याय समानता,लोकहिताचा सर्वस्वी विचार,
समता आणि स्वातंत्र्याचे संविधानाने दिले आम्हा अधिकार “
भारतीय संविधानानेच प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदान्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत.
संविधानाची निर्मिती हा देखील दीर्घ प्रवास होता. २ वर्षे ११ महिने कामकाज, १४४ दिवस चर्च, ३८e विद्वान सदस्य अशा मंथनातून संविधान अस्तित्वात आले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मसूदयाला मान्यता दिल्या नंतर २६ जानेवारी १९५० संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि प्रजासत्ताक भारताची मुहुर्तमेढ रोवली.
भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. अनेक संविधानिक ‘मूल्यांनी भारतीय संविधान सामाजिक समता, तसेच लोकशाही जीवनमूल्यांची जगाला शिकवण दिली आहे. आपण रोज संविधानाची उद्देशिका परिपाठात म्हणतो तेव्हा संविधानाची महती आपल्याला कळते.
भारतीय संविधानाने आपल्याला अनेक अधिकार आणि हक्क दिले आहेत. मग आपणही संविधानातल्या मूल्यांचा आणि तत्वौचा अंगिकार करून जबाबदार नागरीकाचे वर्तन करायला हवे. संविधानानेच लोकशाही व मानवाचे अधिकार अबाधित रहाणार आहेत.
” संविधानाचे जाणूनी महत्व, संविधानाचा राख्या सन्मान, लोकहितवादी लोकशाहीला, संविधानाचा असे अभिमान चला राख्या संविधानाची शान ॥