थायलंडवरून आली १०० फुटांची गौतम बुद्धाची मूर्ती, मात्र दीक्षाभूमीचा स्वीकारण्यास नकार

सामाजिक

प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्म परिवर्तन केले होते. याच दीक्षाभूमीवर थायलंड देशातून दान करण्यात आलेल्या गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यास दीक्षाभूमी स्मारक समितीने नकार दिला आहे. स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी सोमवारी ही माहिती दिली.

दीक्षाभूमीवर एकुण चार बुद्धमुर्त्या आहेत. त्यापैकी स्तूपात दोन, वरच्या हॉलमध्ये एक, स्तूपाच्या बाहेर एक मूर्ती आहे. या व्यतिरिक्त एक मूर्ती पेटीत बंद आहे. गौतम बुध्दाची एक मोठी मूर्ती थायलंडवरून आलेली आहे. ही मूर्ती दीक्षाभूमीवर जागेअभावी लावणे शक्य नाही. दीक्षाभूमीची जागा मर्यादित आहे. ती मूर्ती दीक्षाभूमीवर ठेवल्यास त्या मूर्तीच्या सौंदर्यकरणास एक ते दोन एकर जागा जाईल. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात लोकांना जागा अपुरी पडेल, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

बुद्ध मूर्ती दीक्षाभूमीवर ठेवण्याकरिता समितीने कोणताही ठराव केला नव्हता. मूर्ती का स्वीकारली हे दीक्षाभूमीच्या सदस्यांनाही माहीत नाही, असेही समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.