• Home
  • क्राईम
  • तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला
Image

तरुणीच्या प्रेमासाठी प्रियकर बनला तोतया सैन्यअधिकारी, डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला

प्रतिनिधी

तरुणीच्या प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने तिचे प्रेम मिळविण्यासाठी तोतया सैन्य अधिकारी बनला. तिला ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भेटायला गेला. मात्र, तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केल्यामुळे तो चौकशीच्या जाळ्यात अडकला. त्याला वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, त्या युवकाच्या कृतीमुळे ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरातील सुरक्षा यंत्रणा पुरती हादरली होती. अभिजीत अनिल चौधरी (रा. प्लॉट क्रमांक १६, कटरा लेआउट, हिंगणा) असे तोयया ब्रिगेडियरचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार १३ फेब्रुवारीला ३२ वर्षीय आरोपी अभिजीत चौधरी हा भारतीय लष्करातील ब्रिगेडियरची वर्दी घालून गेट क्रमांक २ येथे एका तरुणीसोबत बोलत होता. तरुणीच्या तो प्रेमात पडलेला दिसत होता. तिला प्रेमाची मागणी घालत होता. दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेल़े. यावेळी आरोपी अभिजितने त्यांना पाहताच डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला. ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी तरुणीसोबत इथे काय करतोय आणि त्या अधिकाऱ्याने डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ मारल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच त्याला जवळ बोलावले आणि काही प्रश्न केले. यावेळी तो उत्तरे देऊ शकला नाही.

याबाबत त्यांनी लगेच वाडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळे ओळखपत्र आढळले. केवळ प्रेयसीला ‘ईम्प्रेस’ करण्यासाठी सैन्य अधिकाऱ्याची वर्दी घातल्याची कबुली त्या तरुणाने दिला. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात गैरकायदेशीररित्या प्रवेश घेतल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार राजेश तटकरे पुढील तपास करीत आहेत.

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026