• Home
  • क्राईम
  • कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले
Image

कोल्हापुरात सराफांना दणका; बंगाली कारागिराने दीड किलो सोने लांबवले

प्रतिनिधी

कोल्हापूर येथील सराफ व्यावसायिकांचे सुमारे पाऊण कोटी रुपये किंमतीचे दीड किलो सोने घेऊन बंगाली कारागीराने अन्य साथीदारांसह गुरुवारी पलायन केले. काशिनाथ बंगाली असे त्याचे नाव आहे. या घटनेने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.

काशिनाथ बंगाली हा सोने कारागीर गेली पंधरा वर्षे गुजरी परिसरातील महादेव गल्लीत राहत होता. कोल्हापुरातील अनेक सराफ पेढ्यांचे दागिने बनवण्याचे तो काम करत होता. त्याच्याकडे जवळपास आठ ते दहा कामगार काम करत होते. आज सकाळी आपल्या आठ ते दहा साथीदारांसह त्याने कोल्हापुरातून पोबारा केला.

याची माहिती मिळताच त्याच्याकडे दागिने करण्यासाठी सोने दिलेल्या सराफांनी महादेव गल्ली परिसरात गर्दी केली होती. घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्वप्निल भुरके यांचे ९३ ग्रॅम, राघवेंद्र रेवणकर यांचे ६०० ग्रॅम, तर चिपडे सराफ यांचे २५० ग्रॅम सोने घेऊन काशिनाथ बंगाली या परप्रांतीय कारागिराने पोबारा केला. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता असून जुना राजवाडा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून फसवणूक झालेल्या सराफ व्यवसायिकांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

Releated Posts

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026

ऑनलाईन गेमिंगच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; पुणे पोलिसांनी मोठ्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश

प्रतिनिधी ऑनलाईन गेम खेळून अल्पावधीत मोठी कमाई करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या सायबर…

ByBymnewsmarathi Jun 13, 2026