• Home
  • क्राईम
  • डोंबिवलीत तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून ३३ लाखांची फसवणूक
Image

डोंबिवलीत तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून ३३ लाखांची फसवणूक

प्रतिनिधी

डोंबिवली  येथील एका तरूणाची ऑनलाईन व्यवहारातून भामट्यांनी ३३ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. हेमांशु हर्षदकुमार शहा (४०, रा. विको नाका, एमआयडीसी, डोंबिवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. गेल्या महिन्यात भामट्यांनी तक्रारदार हेमांशु यांना संपर्क साधला. त्यांना ऑनलाईन व्यवहारांची माहिती देऊन या व्यवहारात गुंतवणूक केल्यास झटपट दामदुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखविले. सुरुवातीला पैसे मिळत गेल्याने हेमांशु यांनी टप्प्याटप्प्याने एकूण ३३ लाख २८ हजार रुपये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केले.

या गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळणे आवश्यक होते. तो मिळणे बंद झाले. आकर्षक व्याज आणि मूळ रक्कम परत मिळावी म्हणून हेमांशु शहा भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. सुरूवातीला त्यांनी किरकोळ कारणे देऊन हेमांशु यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला प्रतिसाद देणे बंद केले. आपणास भामट्यांनी फसविले याची खात्री पटल्यावर हेमांशु यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली परिसरात ऑनलाईन माध्यमातून फसवणुकीचे सुमारे १०० हून अधिक गुन्हे घडले आहेेत. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. गांगुर्डे तपास करत आहेत.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026