जवानांच्या घर ते कर्तव्य या गोष्टींवर आधारीत येत्या सात मार्च ला प्रेमवारी प्रोडक्शन प्रस्तुत फौजी-एक ह्रदयस्पर्शी प्रवास या नावाचा वेबसिनेमा युट्युबवर आपल्या भेटीला येतोय.* *निर्माता दिग्दर्शक किरण गाजरे*

Uncategorized

आजवर अनेक चित्रपटांमधुन जवान लढाई करताना दाखवले आहेत किंवा त्यांना काही टारगेट देऊन युद्धपट बनवले आहेत.मात्र प्रेमवारी प्रॉडक्शन प्रस्तुत फौजी एक ह्रदयस्पर्शी प्रवास या वेबसिनेमात फौजी सुट्टीला जेव्हा घरी येतो तेव्हा काय होतं ते यात मांडले जाणार आहे. बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा असे टिम चे म्हणणे आहे.
याची कथा पटकथा विक्रम पिसाळ यांची असुन त्यांनी यापुर्वी या कथेचे काही शाळांमधुन कथाकथन ही केले होते. त्याला उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर त्यांनी याचे वेबसिनेमात रुपांतर होईल का असे दिग्दर्शक किरण गाजरे यांना विचारले असता त्यांनी कथा ऐकुन लगेच ते तयार झाले. आणि आता हा वेबसिनेमा सात मार्च ला युट्युबवर रिलिज होतोय.

आजवर युद्धपट किंवा तत्सम चित्रपट भरपुर झालेत.मात्र फौजी चे सुट्टीला घरी आल्यावर काय होतं हे कुठेच मांडल नव्हतं. ते यातुन मांडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितलं जातय. या सिनेमाच दिग्दर्शन किरण गाजरे यांनी केले आहे. या आधी त्यांच्या अनेक वेबसिरीज व वेबसिनेमे युट्युबवर चांगलेच गाजले आहेत.
या वेबसिनेमात मुख्य भुमिकेत रोहित व्हावळ,साक्षी परकाळे आहेत. तर विष्णु भारती, महादेव फणसे,मनिषा चौगुले,संजय जाधव ,पल्लवी ननावरे, निकिता राऊत, निखिल शहा असे कलाकार आहेत.तर बालकलाकार म्हणुन आराध्या गायकवाड, आर्यन यादव हे कलाकार आहेत. डिओपी स्व.अमोल लोणकर यांचे असुन सह दिग्दर्शन आशिष जाधव यांचे आहे. प्रॉडक्शन हेड व प्रॉडक्शन मॅनेजर स्वप्नील गायकवाड व निखिल शहा आहेत.व एडिटर किरण गाजरे आहेत.तसेच म्युजिक टी.एम पवार यांचे आहे.व ड्रोन अतुल भालेराव यांनी हाताळला आहे.वेबसिनेमाचे लेखक विक्रम पिसाळ असुन त्यांना सहाय्यक लेखक म्हणुन ओंकार टिळे यांची साथ लाभली कौटुंबिक पार्श्वभुमी असलेला हा वेबसिनेमा अनेकांना आवडेल असं टिम चे म्हणणे आहे.सर्व वयोगटातील लोक हा वेबसिनेमा पाहु शकतात असे ही त्यांनी सांगितले आहे. तेव्हा सात मार्च ला सर्वांनी हा फौजी-एक ह्रदयस्पर्शी प्रवास वेबसिनेमा प्रेमवारी प्रॉडक्शन या युट्युब चॅनेलवर पहावा असे टिम ने सांगितले आहे.