बारामती ! कोऱ्हाळे बु. यथे वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने गावबंद ठेऊन केला निषेध व्यक्त .

Uncategorized

प्रतिनिधी –

दि. 4 मार्च 2024 रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भिवंडी येथील संकेत भोसले याच्या हत्येच्या निषेधार्थ त्याच्या मारेकऱ्यांना अटक होऊन फाशीची शिक्षा व्हावी यासंदर्भात कोऱ्हाळे बुद्रुक गाव बंद ठेवण्यात आले होते. या अल्पवयीन मुलाची हत्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपजिल्हाप्रमुख व त्याच्या साथीदारांनी मिळून केली होती . तसेच मारत असतानाचे व्हिडिओ ही व्हायरल केले होते त्यातील दोन जणांना अटक झाली असून बाकीचे 20 मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत.

तसेच परळी येथे झालेल्या ब्राह्मण एक्य परिषदेमध्ये केतकी चितळे हिने ऍट्रॉसिटी कायदा संदर्भात बेताल वक्तव्य केल्याने व मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मा.मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याच्या कारणास्तव याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी कडून कोऱ्हाळे बुद्रुक गाव बंद ठेउन निषेध व्यक्त करण्यात आला .

याला प्रतिसाद देत सोमवार दिनांक 4 मार्च रोजी संपूर्ण गाव बंद ठेवून ग्रामपंचायत प्रशासनाने तसेच ग्रामस्थांनी व संपूर्ण व्यापारी वर्गाने सहकार्य केले. या बंद शांततापूर्वक पार पाडण्यासाठी प्रतिक चव्हाण (महासचिव पुणे जिल्हा पूर्व वंचित बहुजन युवा आघाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल चव्हाण (उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी बारामती तालुका) तसेच महेश चव्हाण (संस्थापक/अध्यक्ष -बौद्ध युवक संघटना), गणेश गायकवाड(अध्यक्ष भीम फाउंडेशन ), भूषण चव्हाण सागर जगताप, दीपक चव्हाण, श्रीकांत चव्हाण, किशोर पानसरे, प्रज्वल शेलार, रोहित चव्हाण, मंगेश चव्हाण, मंगेश सोनवणे यांनी प्रयत्न केले.