Image

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

प्रतिनिधी

लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अश्विनी डोमडे (वय २७) असे या मयत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही महिला लोकलने प्रवास करत असताना लोकलमधून पडली.

नाहूर रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या ओळखपत्रावर तिने अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026