Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Image

धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रतिनिधी

एका १२ वर्षीय मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात घडली. या घटनेचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयाच्या मुलीने गळफास लावल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निशिला संजय बागडे (१२) रा. जोशीवाडी असे मृत मुलीचे नाव आहे.

निशिला सहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील संजय हे टेक्निशियन आहेत तर आई खासगी शाळेत शिक्षिका आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास आई-वडील आणि निशिलाची आजी आप-आपल्या कामावर गेले. घरी तिचा ७ वर्षांचा भाऊ होता. दोघांनीही एकत्र बसून चिप्स खाल्ले. ११.३० वाजताच्या सुमारास ऑटो आला आणि लहान भाऊही शाळेत गेला. निशिला घरी एकटीच होती. या दरम्यान तिने घरी हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास लावला. दुपारी दोन वाजताच्या सुमारास आजी घरी परतली असता निशिला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. आजीने आरडा-ओरड केल्याने शेजारी गोळा झाले. आई-वडिलांना घटनेची माहिती देण्यात आली. तत्काळ तिला खाली उतरवून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी मेडिकलला घेऊन जाण्यास सांगितले. मेडिकलच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

निशिलाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुटुंबीयांनाही याबाबत कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी शेजाऱ्यांकडेही विचारपूस केली. सर्वांनी सांगितले की, निशिला अभ्यासात हुशार होती. शाळेत जाण्यापूर्वी निशिलाने लहान भावाला जादू दाखवते असे सांगितले होते. उत्सूकतेपोटी ही घटना घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026