प्रतिनिधी – फिरोज भालदार
बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथे धुमाळ परिवाराकडून महाशिवरात्र निमित्त सर्व शिवभक्तांना मोफत रस वाटपाचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाची परंपरा दरवर्षी धूमाळ कुटुंब पार पाडत आले आहे . या कार्यक्रमाला ३५ ते ४० वर्षे झाले असता या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी धुमाळ कुटुंबियांकडून करण्यात येते .
या कार्यक्रमाची सुर्वात सोमेश्वर साखर कारखान्याचे संस्थापक संचालक कै. बबुरावदादा धुमाळ यांनी चालू केले होते. आपल्या आजोबांची ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी व यानिमित्ताने आपल्याला देखील शिवभक्तांची सेवा करता येईल व धुमाळ कुटुंबियांकडून ही परंपरा अशीच चालू ठेवली जाईल असे अनिलभैय्या धुमाळ , सदोबाचीवाडीचे उपसरपंच ऋषिकेश धुमाळ , शक्ती धुमाळ , व गौरव धुमाळ यांच्याकडून सांगण्यात आले .
या कार्यक्रमामध्ये एक हजार हून अधिक शिवभक्तांनी / लोकांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला . यावेळी कुमार आगम , महेश जगताप , बाळासाहेब जाधव , प्रशांत मोरे ,योगेश जाधव , बबलू गाडे ,गणेश खरात यांनी या कार्यक्रमामध्ये सहकार्य केले .