मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

प्रेयसीच्या वडिलाला पाठवली मुलीची अश्लील चित्रफीत

mnewsmarathi प्रतिनिधी
March 11, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

एक तरुण अनेक दिवसांपासून परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवत होता. अश्लील चित्रफीत फेसबुकवर टाकण्याची धमकी देऊन दबाव टाकत होता. मुलीने विरोध केला असता त्याने तिच्या वडिलांना अश्लील चित्रफीत पाठविली. हा प्रकार शांतीनगर पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. प्रज्योत हरिहर बंडोले (२०) रा. शांतीनगर, असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

पीडित मुलगी अकरावीची विद्यार्थिनी आहे. आरोपी प्रज्योत हा चिमूरच्या एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. एकाच वस्तीत रहात असल्याने दोघांची ओळख होती. या दरम्यान प्रज्योतने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी प्रज्योतचे मुलीशी भांडण झाले. त्यानंतरही प्रज्योत तिला त्रास देत होता. त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिचे नग्न छायाचित्र आणि चित्रफीत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देत होता. तरीही मुलीने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. यामुळे चिडून त्याने मुलीच्या वडिलांना अश्लील चित्रफीत पाठवली.

मुलीची विचारपूस केली असता सर्व प्रकार पुढे आला. प्रज्योत विरुद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पोक्सो आणि आयटी ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून प्रज्योतला अटक केली.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा